महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Mantrimandal vistar 2022) हाेणार आहे. या पार्श्वभुमीवर काेणाला मंत्रीपद मिळणार आणि काेणाला नाही याची उत्सुकता राज्यातील जनते बराेबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde latest news) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis latest news) यांच्या समर्थकांसह विराेधी पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना लागली आहे. दरम्यान शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्तार हाेण्यापुर्वीच शिवसेनेप्रति प्रेम, विश्वास असलेल्यांना माताेश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे रत्नागिरीत (Ratnagiri) म्हटलं आहे.
खासदार विनायक राऊत म्हणाले तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय असं ऐकिवात आहे. प्रत्यक्ष शपथ घेतली तेव्हा ते खरं ठरेल. पण तरीसुद्धा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
चाळीस पैकी आठ ते दहा जणांना मंत्रिपद मिळेल. बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले अशी टिप्पणी देखील राऊत यांनी केली. तसेच ज्यांना नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्यासारखा ज्यांना शिवसेनेप्रति विश्वास आहे अशांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असंही राऊत यांनी नमूद केले.
जेवढं औट घटकेचं मंत्रिपद मिळेल त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावं असा टोला विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत (Uday Samant) यांना लगावला आहे. देशातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा आहे मात्र याकडे ईडीने लक्ष दिलं नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली.