महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । जून्या सहकाऱ्यांना संधी देत आहे. टप्प्याटप्प्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी असेल असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नंदनवन या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीसाठी ते थोड्यावेळातच जातील पण कुणाच्या पारड्यात मंत्रिपद मिळणार आणि कुणाची नाराजी भोवणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
शिंदे गटातील हे आमदार होणार मंत्री
1. दादा भूसे, 2. संदीपान भूमरे, 3. उदय सामंत, 4. शंभूराज देसाई, 5. गुलाबराव पाटील, 6. अब्दुल सत्तार, 7. संजय राठोड, 8. दिपक केसरकर, 9. तानाजी सावंत
शिंदे-भाजप सरकारचा राजभवनावर आज शपथविधी होणार असून तेथे तयारी सुरू आहे. राज्यात एकूण बारा ते अठरा आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिंदे गटातील दादा भूसे म्हणाले की, सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. नाराजाबद्दल मला माहित नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंच्या तत्कालिन सहकाऱ्यांना मंत्रीपद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत काम करणारे दादा भूसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. या तिघांच्या समावेशाने ठाकरे गटाला शह आणि शिंदे गटाला बळकट करण्याचा मनसुबाही दिसतो. तूर्त शिंदे गटातील सहा आमदारांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याचे समोर आले आहे.
उदय सामंताचे नाव फिक्स
तानाजी सावंत, दिपक केसरकर, यांच्यासोबतच टीईटी घोटाळ्यातील यादीत अब्दुल सत्तार यांच्या अपत्यांची नावे आली त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत ते पिछाडीवर आहेत. तर उदय सामंत यांचे नाव फिक्स झाले असून भरत गोगालले यांच्या नावावर जोरदार चर्चा होत आहे. मंत्रीपदाबाबत माझ्यासंदर्भात निर्णय झाला नाही असे आमदार आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय राठोड सीएमला भेटले
ठाकरे सरकारच्या काळात मंत्री असलेले संजय राठोड यांना एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावे लागले. त्यानंतर आजही त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत नाव नाही. ते शिंदे यांच्याकडे लाॅबिंग करीत आहेत. नांदेड येथेही काल ते मुख्यमंत्र्यांसोबत होते पण त्यांनी लगेचच आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांचेही नाव निश्चित झाले आहे.
शिंदे यांचा निर्णय अंतीम- भूमरे
पैठणचे आमदार संदीपान भूमरे मी सिनीयर की, कोण ज्युनियर हे महत्वाचे नाही. आमच्या मंत्रिपदाबाबत शिंदे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील.
भुमरे होतील मंत्री
अब्दुल सत्तार, संजय राठोड, भरत गोगावले यांच्या नावावर अजून शिकामोर्तब झाले नाही. मात्र, संदीपान भुमरे यांचे नाव सध्या या सर्वांच्या समोर असून त्यांच्या पारड्यात मंत्रीपद पडणार आहे.
18 आमदार शपथ घेतील -सामंत
शिंदे सह्याद्रीवरील बैठकीत जी नावे फायनल होतील त्यात एकूण अठरा लोकांचे कॅबिनेट असेल त्यात शिंदे गटाचे नऊ आणि उर्वरित नऊ भाजपचे आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील.