महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । सलमान मुल्ला । उस्मानाबाद । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज संपन्न झाला. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा.डॉ. तानाजी जयवंतराव सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही त्यांनी राष्ट्रवादीवर अनेकदा जाहीरपणे टीका केली होती.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले तेव्हा सावंत हे त्यांच्याबरोबर होते. सुरत व गुवाहाटी येथेही ते सोबत होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना शिवसेनेकडून उमेदवारही मिळाली होती.तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार सावंत यांनी त्यांना पाठींबा दिला होता.
आता तानाजी सावंत यांना कोणते खात्याचे मंत्रिपद मिळणार आणि त्याचा फायदा उस्मानाबाद जिल्ह्याला कितपत होणार याकडे संपुर्ण जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे…