भाजपला घरचा आहेर ; ‘संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद देणे हे अत्यंत दुर्दैवी’, चित्रा वाघ संतापल्या,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अखेर 39 दिवसांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भावी मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देत आहे. यावेळी संजय राठोड यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. संजय राठोड यांना शपथ देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *