गिरगावच्या आठवणी ; चाळीतील दहीहंडी आणि बेभान होऊन नाचणारे प्रदीप पटवर्धन ! Video

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan Death) यांनी ०९ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गिरगावच्या राहत्या घरी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे, एक पोकळी निर्माण झाली आहे. ज्या गिरगावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या गिरगावशी संबंधित त्यांच्या लाखो आठवणी आहेत. गिरगावकरांसाठी ०९ ऑगस्टचा दिवस अत्यंत दु:खद होता.

दरम्यान प्रदीप पटवर्धन यांचा गिरगावमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्रातील प्रथा-परंपरा ज्याठिकाणी तरुणाईही आवडीने जपते असं मुंबईतील ठिकाण म्हणजे गिरगाव. दहीहंडीचादेखील याठिकाणी मोठा उत्साह असतो. गिरगावातील चाळी अजूनही या सणासुदीच्या काळातील उत्साहाच्या साक्षीदार आहे. गेल्यावर्षीही अशी दहीहंडी साजरी केली जात होती आणि त्यावेळी प्रदीप पटवर्धन बेभान होऊन नाचत होते. प्रदीप यांचा हा व्हिडिओ एकाचवेळी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे. गिरगावकर हळहळ व्यक्त करत आहेत की प्रदीप यांचा हा उत्साह आता पुन्हा पाहायला मिळणार नाही.

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी त्यांच्या लाडक्या पट्या दादाच्या या व्हिडिओवर कमेंट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रदीप यांचे जेवढे प्रेम अभिनयावर होते, तेवढीच त्यांना नृत्याची आवड होती. त्यांच्या मित्रांनी याबाबत अनेकदा सांगितले आहे. अवघ्या काही दिवसांवर दहीहंडी येऊन ठेपली असताना प्रदीप पटवर्धन यांचे निधन मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.

https://www.instagram.com/bhatsandesh/?utm_source=ig_embed&ig_rid=295aaa80-296e-4f9c-817a-20b2b328b6e6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *