महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यातील ईटकुर येथील गायराण वस्तीवरील वयोवृद्ध आजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बसली होती.कुटुंबातील व्यक्तीं दि .९ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान ग्रामपंचायत प्रांगणात रिमझिम पावसात सोडून गेल्याने मुले , सुना , नातवंडे असुनही आजीला बेघर करण्यात आले होते .
ही गंभीर बाब ग्रामपंचायत कार्यालतुन बाहेर आल्यास देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे – पाटील , भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदिप भैय्या फरताडे , महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष , भारत तात्या जाधव , ग्राप .सदस्य विनोद चव्हाण , ग्राप. ग्रामविकास अधिकारी आमले यांच्या निदर्शनास आले..त्यांनी आजीची आस्थेवाईकपणे विचारपुस करून त्यांना निवाऱ्यात आणून बसविले व चहा पाजुन नविन उबदार ब्लँकेट पांघरून घालुन माणुसकीचे दर्शन घडविले .
त्या सर्वांनी गायराण वस्तीवर जावून त्यांच्या मुलाला घरी आणण्यास सांगितले परंतु हो म्हणून मुलाने घरी नेले नाही.
दि .१० ऑगस्ट रोजी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यशवंत जाधव यांना संपर्क साधुन सदर घटनेची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ ईटकूर बीटचे पो.हे.कॉ . बाळासाहेब तांबडे , पो.ना . पोपट जाधव यांना तातडीच्या सुचना देवून ईटकुरला पाठवले पोलीस कर्मचारी तांबडे व जाधव यांनी येताना गायराण वस्तीवरुन आजीच्या नातेवाईकांना अवघ्या एका तासात घेऊन आले आणि वयोवृद्ध आजीला त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले व आजीची व्यवस्थितपणे देखभाल करण्यास सांगितले..
यावेळी पोलीस पाटील सोमनाथ जगताप यांची उपस्थिती होती .पोलीस व नागरीकांच्या या वृद्धांबाबत आपुलकीच्या कामगिरी बद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे.