Pune Rain | पुण्यात पावसाचे थैमान ; जिल्ह्याच्या चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुण्यात सपाटाच लावला आहे. पुण्यातील धरणसाखळीतही तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तसेच इतरही धरणक्षेत्राच चांगला पाऊस (Rain) पडला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची (Pune) पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसांची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुण्यातील धरण क्षेत्रातही तुफान पाऊस कोसळला आहे. त्यात गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मंगळवार सकाळपासून ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे १४ मिलीमीटर पाऊस झाला. तर दुसरीकडे पानशेत व वरसगाव येथे अनुक्रमे ९० व १०० मिलीमीटटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर टेमघर येथे सर्वाधिक म्हणजे १६० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात तुफास पाऊस पडल्याने खडकवासला धरण आज १.०७ टीएमसी म्हणजे ५४.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर पानशेत धरणात आज सकाळी सहा वाजता ९.८८ टीएमसी म्हणजे ९२.७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर वरसगाव धरणात आज १०.८३ टीएमसी म्हणजे ८४.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच टेमघर धरणात आज २.५० टीएमसी म्हणजे ६७.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणात २४.२९ टीएमसी ८३.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *