Raju shrivastav Health Update: राजू यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. प्रत्येक लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना आहे. दरम्यान रुग्णलयातून त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांची बीपी काही काळासाठी नॉर्मल झाली होती. त्यांच्या पायात काही प्रमाणात हालचालही झाल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीतील हा सुधार फार काळ टिकला नाही. त्यांची बीपी पुन्हा कमी-जास्त होत आहे. त्यामुळे आता त्यांच्या हृदया ऐवजी त्यांचा मेंदू डॉक्टरांसाठी आव्हानत्मक ठरत आहे. अजूनही त्यांचा मेंदू प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे डॉक्टारांची चिंता वाढली आहे. तसेच राजू 43 तासांपेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर आहेत.राजूच्या उपचारासाठी कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम तसेच न्यूरोलॉजी टीम तैनात करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळची जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांच्यात उपचार सुरु आहेत. उपचारांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टर चिंतेत आहेत. काल डॉ.अनन्या गुप्ता यांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांची बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला सामान्य वॉर्डात हलवलं जातं. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतकी कायम आहे. त्यामुळे प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाहीय. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *