एप्रिल महिन्यात दिवसाकाठी २ हजार कोरोनाग्रस्त अमेरिकेत मृत्यूमुखी; मृतांचा आकडा ५० हजारांवर

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वांधिक थैमान घातले आहे. अमेरिकेत गेल्या २४ दिवसात दिवसाला सरासरी २ हजार जणांचा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५० हजार जणांचा बळी गेला आहे. हा कोणत्याही देशातील सर्वांधिक आकडा आहे. दरम्यान, या परिस्थितीवर मात करण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडून ४८४ बिलीयन डॉलरच्या मदत पॅकेजला मान्यता देण्यात आली आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि वल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत ५० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांचा आकाडाही दिवसागणिक वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ८ लाख ६८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील अनेक राज्यांनी अजून बाधितांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे हा आकडा १० लाखांच्या घरात असू शकतो.

अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा एका बाजूने वाढत असताना बेरोजगारांची संख्याही दुप्पट वेगाने वाढत आहे. आतापर्यंत अमेरिकेत २ कोटी ६० लाख जणांनी बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केला आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक ६ अमेरिकन कामगारांच्या मागे १ अमेरिकन कामगार बेरोजगार झाला आहे. अमेरिकेत ही भयंकर स्थिती १९३० मध्ये आलेल्या महामंदीनंतर प्रथमच झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *