किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी पूर्णपणे चुकीची – डोनाल्ड ट्रम्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन -उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहे. किम संदर्भात बातमी देणाऱ्या सीएनएनवर त्यांनी टीका केली आहे. ‘किम आजारी असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत’ असे ट्रम्प गुरुवारी पत्रकारांना म्हणाले.

किम ठणठणीत असल्याची माहिती थेट उत्तर कोरियावरुन मिळाली आहे का? या संदर्भात ट्रम्प यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. याउलट त्यांनी ही बातमी देणाऱ्या सीएनएन वाहिनीवर हल्लाबोल केला. या वाहिनी बरोबर ट्रम्प यांचे पूर्वीपासूनच खराब संबंध आहेत.

‘माझ्या मते सीएनएन वाहिनीने किम संदर्भात खोटी बातमी दिली’ असे ट्रम्प करोना व्हायरस संबंधी नियमित होणाऱ्या पत्रकार परिषदेत म्हणाले. किम जोंग उनवर शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे यावर लक्ष आहे असे वृत्त सोमवारी सीएनएन वाहिनीने अमेरिकेतील अज्ज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले होते. कार्डीओवॅस्क्यलर (cardiovascular) आजारामुळे काही दिवसांपूर्वी किम जोंग उनवर शस्त्रक्रिया झाली होती. किम जास्त प्रमाणात धुम्रपान करायचा असे या वृत्तात म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *