शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- १४ ऑगस्ट- मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. उपचारदरम्यान विनायक मेटे (vinayak mete) यांनी अखेरचा श्वास घेतला. (Vinayak Mete passed away)

विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात मेटे हे जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

फॉर्च्युनर गाडीचा चुराडा, चाक सुद्धा तुटले, नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातात मेटे जखमी झाले. त्यांना तातडीने पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. पण उपचारदरम्यान सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *