महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : दि. 14- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. तेव्हा कोल्हापूर विमानतळावर माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित यांनी त्यांची भेट घेतली.मतदारसंघात काहीही काम असेल तर थेट मला फोन कर असे म्हणत काम करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना दिला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यामुळे बाबर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. याशिवाय कोल्हापुरात त्यांनी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या दरम्यान ते कोल्हापूर विमानतळावर आले असताना तेथे रोहित पाटील यांनी त्यांची भेट घेतली.