महाराष्ट्र 24 : ऑनलाईन: दि.१४ : आज पश्चिम महाराष्ट्र विभागीय वकील परिषदच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. भूषण गवई साहेब,तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा श्री.वराळे साहेब माजी न्यायमूर्ती तसेच ग्राहक न्यायलयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे यांची ,
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे व प्रथम अध्यक्ष ॲड. सुभाष चिंचवडे, ॲड.संजय दातीर पाटील, नोटरी असोसिएशन अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे, ॲड. दिनकर बारणे यांच्यासह कार्यकारणी सदस्य ॲड. मंगेश खराबे यांनी भेट घेतली, नेहरूनगरच्या न्यायसंकुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे
उद्घाटना संदर्भात उपलब्ध तारीख निश्चित करून वेळ
देण्याबाबत साहेबांना निवेदन देण्यात आले,
तसेच स्पेशल ड्राईव्हच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कलम NI ॲक्ट १३८ चे विशेष पिंपरी येथे न्यायालय मिळावे. यासाठी सुद्धा यावेळी मा.न्यायमूर्ती
गवई साहेब यांना निवेदन देण्यात आले, या परिषदेचे आयोजन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा च्या
वतीने करण्यात आले होते, या परिषदेमध्ये पिंपरीतील
२०० ते २५० वकिलांनी सहभाग नोंदवला . परिषदेच्या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक ॲड. राजेंद्र उमाप हे होते.