एक लाख हुन अधिक नागरिकांकडून ‘आरोग्यसेतू’ अँप डाऊनलोड

Spread the love

महाराष्ट्र24 । मुंबई । विशेष प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. सर्वात महत्त्वाची उपायोजना म्हणजे देशभरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. कोरोनाशी संबंधित माहिती, आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूची जोखीम कितपत आहे यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू अँप लॉन्च केले आहे.जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 845 नागरिकांनी अँप डाऊनलोड करून त्याचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कोरोनाला घाबरू नका, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य सेतू अँप असे करा डाऊनलोड :

गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आरोग्य सेतू सर्च करून हे अँप डाऊनलोड करता येणार आहे. हे अँप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बनवलेले आहे त्यामुळे एनआयसीने जारी केलेले अँप डाऊनलोड करावे.

आरोग्य सेतू अ‍ॅप कसे वापरावे?:

आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर हा अ‍ॅप डाऊनलोड करावा. त्यानंतर ब्लुटूथ आणि लोकेशन ऑन करावे. त्यात सेट लोकेशन “ऑलवेज” असे ठेवावे. आपल्याला आवश्‍यक असलेली भाषा त्यावर नमूद केल्यास त्या भाषेमध्ये सर्व माहिती आरोग्यसेतूद्वारे उपलब्ध होते. अ‍ॅपमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे स्पष्टपणे दिल्यास आपल्यामध्ये कोविडच्या आजाराची लक्षणे आहे का? याची माहिती देखील लगेच मिळते. यासह इतर आजारांविषयीची माहितीदेखील त्यावर मिळत असल्याने हा अ‍ॅप लोकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *