किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत अजूनही रहस्य कायम; चीनच्या डॉक्टरांची टीम उत्तर कोरियात दाखल

Spread the love

महाराष्ट्र 24 । मुंबई । उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत अजूनही रहस्य कायम आहे. रोज त्यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत असतात. आता किम जोंग यांच्यासाठी चीनने आपल्या सर्वोत्तम डॉक्टरांची टीम उत्तर कोरियाला पाठवली असल्याच्या बातम्या येत आहेत. याआधी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले होते, त्यानंतर दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली. मात्र अद्याप किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात, चीनने उत्तर कोरियात आपली एक मेडिकल तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. ही टीम किम जोंग यांच्या आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सल्ले देण्यासाठी पाठवण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय लायजन विभागाच्या एका सदस्याच्या नेतृत्वाखाली ही टीम प्याँगयांगमध्ये दाखल झाली आहे.

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायमयाआधी दक्षिण कोरियाच्या एका सुत्रांनी किम जोंग यांची प्रकृती ठीक असून, लवकरच ते लोकांसमोर येतील, असे सांगितले होते. मात्र सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *