मोहित कंबोज यांचा रोख अजितदादांकडे ? अमोल मिटकरी खवळले, एकेरी भाषा वापरत हल्लाबोल

 81 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्वीट करत खळबळ माजवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत कंबोज यांनी दिले आहेत. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. त्यावर आता विरोधकांकडून मोठ्याप्रमाणात आक्रमक अशा प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही या प्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर जोरदोर टीका केली आहे. मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. तो काय पुर्णवेळ ईडीच्या कार्यालयात बसतो का याची कारवाई व्हायला हवी असंही ते म्हणाले.

“मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का. याला कसं माहिती पडतं की ईडी आणि सीबीआय कुठे कारवाई करणार आहे. हा ईडी कार्यालयात पुर्णवेळ बसणारा नेता आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे. त्याला दुसरं काहीही जमत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकटवण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *