कोकणाचा आणखी एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्याचे परिणाम कोकणातही दिसायला लागलेत. कोकणातून केवळ ३ आमदार ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेत. बाकी सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांना सध्या राज्यभरातून १५ सेना आमदारांचं पाठबळ आहे. त्यातही ३ आमदार कोकणातील आहे. भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक तिघेही ‘मातोश्री’च्या जवळचे आहेत. मात्र हाती आलेल्या बातमीनुसार, याच तीनपैकी एक आमदार ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. अशी बातमी महाराष्ट्र टाइम्स ने दिली आहे.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. याच मुद्दयावरून कोकणातील आणखी एक विद्यमान शिवसेनेचा ज्येष्ठ आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आता जोर धरू लागली आहे. तसे झाल्यास उद्धव ठाकरे यांना कोकणात सर्वांत मोठा धक्का बसणार आहे.

दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं. तसेच कोकणात उद्योग आल्यास येथील बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल, रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे आपण या रिफायनरी बाबत ज्यांचे गैरसमज असतील ते दूर करू अशी भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी आमदार राजन साळवी यांचीही आपण लवकरच भेट घेऊन चर्चा करू असे जाहीरपणे सांगितले होते. अर्थात ही भेट रिफायनरीच्या मुद्यावर होणार आहे पण ही भेट झाल्यास या दोन नेत्यांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा होईल, अशी शक्यता आहे.

शिंदे गट

उदय सामंत (रत्नागिरी)
योगेश कदम (दापोली)
दीपक केसरकर (सावंतवाडी)
महेंद्र दळवी (अलिबाग)
महेंद्र थोरवे (पनवेल)
भरत गोगावले (महाड)

ठाकरे गट

राजन साळवी (राजापूर)
भास्कर जाधव (गुहागर)
वैभव नाईक (मालवण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *