विधान परिषद ; ‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’, सभापती गोऱ्हे गुलाबराव पाटलांवर भडकल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसेना (shivsena) आणि शिंदे गट (shinde group) आमनेसामने आला. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी ‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’ असं म्हणत चांगलेच सुनावले.

विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं आहे. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडला. “जर दादागिरी केली जाईल तशी भाषा असेल तर आम्हाला ही उत्तर देता येईल” असं पाटील म्हणाले होते, त्यांच्या या विधानावर दानवे यांनी आक्षेप घेतला आणि पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली.

गुलाबराव पाटील यांच्या विभागाचा प्रश्न सुद्धा नव्हता, पण त्यांना बोलण्याचं काय कारण आहे? असा सवाल दानवेंनी केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली आणि शब्दांने शब्दाने वाढू नये, अशी विनंती केली.पण विरोधी पक्षातील आमदारांनी लॅाबीमध्ये येऊन घोषणाबाजी केली. सभापती गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना ताकीद दिली.

पहिला प्रश्न राखीव ठेवला. गुलाबराव पाटील खाली बसून बोलू नका. तुम्हाला काय बोलायचं आहे, ते बोलावे, कुणालाही इशारा देऊ नये, असा इशारा निलम गोऱ्हे यांनी दिला.

त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले की, एका प्रश्नावर शिक्षणमंत्री उत्तर देत होते, पण विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की, एक मंत्री धमकी देत आहे. मी एक कॅबिनेटमधला सहकारी आहे. अनिल परब यांना प्रश्नविचारला त्यांनी उत्तर दिले नाही, असं पाटील म्हणाले.

पण, तुमच्या विभागाचा प्रश्न नाही, दीपक केसरकर यांच्या विभागाचा हा प्रश्न आहे. तुम्ही हातवारे करून काय बोलताय, ही सभागृहातली पद्धत नाही. दुसऱ्या मंत्र्यांच्या प्रश्नावर आरोप करायचे. तुम्हाला ताकीद देतंय गुलाबराव…खाली बसा. छातीवर हात देवून काय बोलताय,

तुम्ही मंत्री असाल तर घरी, असं म्हणत सभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावले.

त्यानंतर ‘प्रश्न राखून ठेवू नका याचा अर्थ असा होईल की माझ्याकडे उत्तर नाहीये माझ्या कारकिर्दीला हा डाग असेल त्यामुळे राखीव ठेवू नका मंगळवारी दालनात बैठक घेवू, असं म्हणत दीपक केसरकर यांनी म्हणणं मांडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *