महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या किनाऱ्याजवळ समुद्रात गुरुवारी एक संशयित बोट आढळली. तीत ३ एके-४६ रायफली आणि काडतुसे होती. स्थानिक नागरिकांनी ही माहिती सुरक्षा दलांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. बोटीवर अधिकारी-कर्मचारी नव्हते. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले,‘ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या नावाने नोंदणीकृत आहे. खराब हवामानामुळे ती वाहत आली आहे.’ तटरक्षक दलानुसार, “ या बोटीची नोंदणी ब्रिटनमध्ये झाली असून ती ओमानहून युरोपला रवाना झाली होती. प्रवासादरम्यान बोटीतून मदत मागण्यात आली होती आणि २६ जूनला मस्कतजवळ क्रूसह इतरांना वाचवण्यात आले.
शस्त्रास्त्र क्रमांक विक्रेत्यांच्या यादीशी जुळताहेत : पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी बोटीची झडती घेतली. बोटीतील शस्त्रास्त्रांचे क्रमांक विक्रेत्याच्या यादीशी जुळत आहेत.