विनोद कांबळीला या फायनान्स कंपनीने दिली महिना १ लाख पगाराची ऑफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli ) याची आर्थिक परिस्थिती सध्या फारच बिकट आहे. गेल्या दोन दिवसांपासून विनोदच्या आर्थिक परिस्थिती संदर्भातील बातम्या येत आहे. बीसीसीआयकडून महिन्याला मिळणारे पेन्शनचे १ हजार रुपये हेच त्याच्या उत्पन्नाचे एकमेव मार्ग आहे. अशात विनोदच्या मदतीला एक उद्योजक पुढे आले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पदार्पण करणारा विनोद सध्या इतक्या अडचणीत आला आहे की, कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मैदानावर कोणतेही काम करण्याची त्याने तयारी दाखवली आहे. ५० वर्षीय विनोदला आता चाहते ओळखणार देखील नाहीत. पांढरी दाढी, डोक्यावर टोपी घातलेला विनोद जेव्हा एमसीए कॉफी शॉपमध्ये आला तेव्हा फार बारीक दिसला. त्याच्या गळ्यात ना सोन्याची चेन, ना हातात ब्रेसलेट, ना मोठे घड्याळ होते. इतक नाही तर त्याच्या मोबाइलची स्क्रीन देखील खराब झाली होती.

विनोद कांबळीच्या या अवस्थेवर अनेकांना वाईट देखील वाटले. ही बातमी अहमदनगरच्या सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी पाहिल्यानंतर त्यांनी थेट विनोदला नोकरीची ऑफर दिली आहे. संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला एक लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी ऑफर करण्याचे ठरवले आहे.

यासाठी ते लवकरच विनोद कांबळे यांची भेट घेणार असल्याचं संदीप थोरात यांनी सांगितले. देशासाठी खेळलेल्या महान खेळाडूवर अशी परिस्थिती आल्यानंतर नक्कीच ती विचार करायला लावणारी आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्यांना ही नोकरी ऑफर करणार असल्याचा थोरात यांनी म्हटले आहे. सह्याद्री मल्टीस्टेटचे मुंबई येथे फायनान्स कंपनीची शाखा सुरू होणार आहे. त्या शाखेच्या व्यवस्थापक पदासाठी आपण त्यांना ही नोकरी देणार असल्याचं थोरात यांनी म्हटले आहे. मात्र ही नोकरी स्वीकारायची किंवा नाही याबाबत कांबळी यांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *