पोलिसांची पुणेकरांसाठी एक खुली ऑफर; ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण, विनापास मोकाट फिरणाऱ्यांना पुणे पोलिसांनी एक खुली ऑफर दिली आहे. ‘ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! कोणताही पास नाही, असं एक ट्वीट पुणे पोलिसांनी केलं आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कठोर केले असताना पुणे पोलिसांच्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ”तुम्हाला बाहेर जायचंय तर खुशाल जा पण त्यासाठी आमची एकच आहे ती म्हणजे आधी 6 तास कोरोनाचा संसर्ग झालेल्या ‘रेड झोन’मध्ये पोलिसांसोबत ड्युटी करून दाखवावी… बोला आहे मंजूर…” अशा आशयाचं ट्वीट पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *