उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांचे निधन?

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – प्योंगयांग: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांचे निधन झाले असल्याचे वृत्त हाँगकाँगमधील वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तामुळे खळबळ माजली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया याशिवाय कोणत्याही या देशांनी निधनाच्या वृत्तावर कोणतीही माहिती, प्रतिक्रिया दिली नाही. किम जोंग उन यांच्या प्रकृतीवर उपचारासाठी चीनने नुकतेच एक वैद्यकीय पथक पाठवले होते.

किम जोंग उन यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. चीननेदेखील एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला पाठवले आहे. हे वैद्यकीय पथक किम यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासह डॉक्टरांसोबत चर्चा ही करणार असल्याची माहिती होती. हाँगकाँग सॅटेलाइट टीव्हीने किम जोंग उन यांचे निधन झाले असल्याचे वृत्त दिले. या वृत्तासह त्यांनी किम यांच्या मृतदेहाचे फोटोही प्रकाशित केले. मात्र, त्याबाबत काहीच सत्यता पडताळण्यात आलेली नाही. अमेरिका अथवा इतर कोणत्याही देशांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *