मोदींच्या कॅबिनेटमध्ये आता शिंदे गटातील मोहरे ? मंत्रिमंडळ विस्तारात दोघांना संधीची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लवकरच फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांपैकी दोघांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती देखील आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी चांगलं काम केलेलं नाही त्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गेल्या वर्षी जुलै महिन्यात फेरबदल करण्यात आला होता. आता केंद्र सरकार नव्यानं मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटातील कोणत्या दोन खासदारांना संधी मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय जदयूनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जदयूच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं आहे. याशिवाय २०१९ मध्ये शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या समर्थक खासदारांना मंत्रिपद मिळू शकतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातील शिवसेनेच्या ४० आमदारांसंह बंड केलं. त्यानंतर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील १८ खासदारांपैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे , हेमंत पाटील ,प्रतापराव जाधव ,कृपाल तुमाणे,भावना गवळी,श्रीरंग बारणे ,संजय मंडलिक ,धैर्यशील माने ,सदाशिव लोखंडे ,हेमंत गोडसे,राजेंद्र गावित या बारा खासदारांपैकी कोणत्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *