महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । अबकारी धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. मला अटक होऊ शकते, असा दावा सिसोदियांनी केला असतानाच, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठे विधान केले आहे.
मनीष सिसोदिया यांना अटक होऊ शकते. मलाही अटक करतील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले. अबकारी धोरणात कमतरता असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुजरातमधील नागरिकांना अनेक आश्वासने दिली. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
अबकारी धोरण गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयकडून (CBI) सिसोदिया यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर सीबीआयने छापे मारले. या सर्व घटनाक्रमावर अरविंद केजरीवाल यांनी मोठे विधान केले. मनीष सिसोदिया यांना अटक केली जाऊ शकते आणि मलाही अटक होऊ शकते, असे ते म्हणाले.
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येथील मतदारांना अनेक आश्वासने दिली. जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षण मंत्री मी आपल्यासोबत आणले आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृत्तपत्रातही छापून आलेले आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
गुजरातमध्ये एक लाख कोटी मुलं शाळेत जातात. त्यांची फसवणूकच होत आहे. यावेळी भाजपला संधी दिली तर, त्यांची पुढची पाच वर्षे वाया जातील. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सरकार आलं तर गुजरातमधील शहीदांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिले जातील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, भारताला विकसित देश करण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. दिल्लीतील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. गुजरातमधील प्रत्येक मुलाचाही चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्येही प्रत्येक मुलाला सर्वोत्तम शिक्षण दिलं जाईल. अरविंद केजरीवाल यांना एक संधी द्यावी, गुजरातमध्ये मोफत शिक्षण दिलं जाईल, असं सिसोदिया म्हणाले.