Horoscope Today : “या” राशीला आज होणार धनलाभ ; पहा आजचं राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट ।

मेष
आज धनलाभ संभवतो . आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल. शेअर्स मधून लाभ संभवतो.

वृषभ
आज नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. तरुणांनी आळशीपणा करू नये. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. सामाजिक भान ठेवणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

मिथुन
आज महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. योग्य तर्क बांधावा लागेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे.

कर्क
आज घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मुलांचा खोडकरपणा वाढेल. रेस जुगाराची आवड जोपासाल.

सिंह
आज मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका. कामात तत्परता दाखवावी. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल.

कन्या
आज जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक ठेवाव्यात.

तूळ
आज कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा. तरुण वर्गाचे मत जाणून घ्या. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. दृष्टीकोनात बदल करून पहा. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

वृश्चिक
आज आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल. हेतू समजून प्रतिक्रिया द्यावी. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. हाताखालील लोकांवर फार अवलंबून राहू नका.

धनू
आज जोडीदाराचे सौख्य वाढेल. गरजेनुसार काही बदल करून पहा. मनातील नसती चिंता बाजूस सारा. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. जुनी कामे सामोरी येतील.

मकर
आज मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

कुंभ
आज मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका.

मीन
आज तोंडात साखर ठेवून बोलावे. आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. आहारावर नियंत्रण ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *