महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ऑगस्ट । शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर सामनातील त्यांचे लेख कोण लिहितो याच्या मागे देखील ईडी लागली होती. राऊत जेलमध्ये असले तरी त्यांचे लेख कसे छापून येतात? तुरुंगातून ते कसे पाठवू शकतात याचे कोडे उलगडण्याच्या प्रयत्नात ईडी असताना एक महत्वाची माहिती हाती आली आहे.
राऊतांचे साप्ताहिक लेख आता कडकनाथ मुंबईकर लिहित आहे. हा कडकनाथ मुंबईकर कोण? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत तुरुंगात गेल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सामनाची धुरा हाती घेतली आहे. गेल्याच आठवड्यातील सामनातील संजय राऊतांचा लेख हा कडकनाथ मुंबईकर या नावाने लिहून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण कडकनाथ मुंबईकर हे नाव सर्वांनाच नवखे होते. आता हा नवा गृहस्थ कोण अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.