नार्वेकरांचा बंगला तुटला, आता पुढचा हातोडा…, सोमय्यांचा नाव घेऊन शिवसेना नेत्याला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ऑगस्ट । महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि भाजपचं (BJP) सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांचं रिसॉर्ट (Anil Parab Resort) लवकरच तुटणार असल्याचं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. मिलिंद नार्वेकरांचा (Milind Narvekar) बंगला तुटला आता अनिल परबांचं (Anil Parab) रिसॉर्ट तुटेल. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने साई रिसॉर्ट ऍण्ड सी कोन्च रिसॉर्ट पाडण्यासाठीची अंतिम ऑर्डर दिली आहे, असं सोमय्या त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

महाराष्ट्र सरकार आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना रिसॉर्ट पाडायला सांगेल. या पाडकामाची कारवाई जलद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *