महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । राज्यात काही जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Update) दरम्यान होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत किंचीत वाढ झाल्याचे दिसून आहे. याचबरोबर काही भागात पावसाने उघडीप दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज (ता. 25) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होत असले तरी अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 25 विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी असे सांगण्यात आले आहे.
राज्यातील विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.
याचबरोबर मागच्या 24 तासांता राज्यातील माथेरान 70, पेण 60, वाकवली 50, खालापूर, कर्जत, जव्हार प्रत्येकी 40, सुधागड पाली, विक्रमगड, अलिबाग, पोलादपूर, वाडा, मंडणगड प्रत्येकी 30. तर मध्य महाराष्ट्रातील लोणावळा 60, गगनबावडा 50, महाबळेश्वर, राधानगरी, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी 30. घाटमाथा दावडी, ताम्हिणी 110, शिरगाव, डुंगरवाडी प्रत्येकी 90, कोयना नवजा, अंभोणे प्रत्येकी 80, वळवण 70, खोपोली, भिरा प्रत्येकी 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.