महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । ज्या शिक्षकांना आई-वडिलांनंतर गुरु मानतो ते शिक्षकच भक्षक बनले तर मुलांनी विश्वास कोणावर ठेवायचा ? बुलडाणामधील चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zilla Parishad School) एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ तिचा शिक्षकच करत असल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. लैंगिक छळ करणाऱ्या वासनांध शिक्षकाची (Teacher) तक्रार पीडित मुलीच्या आई-वडिलांनी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
मात्र, माध्यमाने ही बाब उघडकीस आणली व त्या ६ वर्षीय विद्यार्थिनीचा आवाज थेट विधानसभाच्या सभागृहात पोहोचला, आमदार उमा खापरे (MLA Uma Khapare) यांनी हा मुद्दा सभागृहात रेटून धरला व दोषी शिक्षकाला बडतर्फ करून चिमुकलीला न्याय देण्याची मागणी केली. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात खळबळ एकच उडाली.
शिवाय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने गाव गाठले व संबाधित शिक्षकाची सखोल चौकशी करायला सुरुवात केली आहे. सर्वांचे जवाब नोंदविण्यात आले असून आता जिल्हा परिषद शिकधन विभाग त्या वासनांध शिक्षकावर काय कारवाई करते याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
मात्र, या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आमच्या मुली सुरक्षित आहेत का आणि ज्या शिक्षकांना आई-वडिलांनंतर गुरु मानतो ते शिक्षकच भक्षक बनले तर मुलांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा सवाल विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित करत आहेत.