Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । राज्यात एकीकडे शिंदे गट (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजकीय सामना रंगला असतानाच, दुसरीकडे अमरावतीत शिवसेनेनं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मोठा धक्का दिला आहे. दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. (Amravati Bacchu Kadu Todays News)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. किरण होले हे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. मात्र, आता त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत हातात शिवबंधन बांधलं आहे.

याव्यतिरिक्त दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील काँग्रेसचे सरपंच योगेश मापारी यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय. अचानक प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळे दर्यापूर तालुक्यात शिवसेना पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *