शिंदे गटाच्या या मंत्र्याच्या अडचणीत वाढ ; कोर्टाने ‘या’ प्रकरणात दिले चौकशीचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । शिंदे गटातील मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्तार यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांनी शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहरते बाबत तफावत असलेली माहिती सादर केली असल्याचा आरोप केला होता, या प्रकरणी आता सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या केसमध्ये पोलिसांना (Police) सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सखोल चौकशी करून ६० दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

सिल्लोड येथील महेश शंकरपेलली व आरटीआय कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ, भा.द. वी कलम १९९,२०० व इतर अंतर्गत केस दाखल केली होती.

मंत्री सत्तार यांनी निवडणुकीसाठी (Election) दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहरतेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. याबाबत सखोल अभ्यास करून महेश शंकरपेलली व डॉ. अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली होती. या केसमध्ये सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते, या आदेशानुसार पोलिसांनी(Police) अहवाल देखील सादर केला आहे.

पोलिसांनी त्रुटीत्मक अहवाल देऊन आरोपींना अभय दिले आहे. याबाबत फिर्यादिनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुन्हा सखोल चौकशी करून ६० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *