महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड या नवीन सहकाऱ्याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या युतीवर मनसेने टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील (raju patil) आणि मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे (kirtikumar shinde) यांनी ट्वीट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…, असं ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. युतीनंतर शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांच्यापाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनी ही जोरदार टीका केली आहे.