महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वरील अस्तित्वात असणारा पुणे (बावधन) एन.डी.ए.- मुळशी उड्डाणपूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधणे प्रस्तावित करण्यात आले असल्यामुळे यादरम्यान असणाऱ्या पाणी पुरवठा, दूरध्वनी, विद्युत वाहिनी, तसेच अन्य सेवा वाहिन्या संबंधितांनी १० सप्टेंबर पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरातील मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील चांदणी चौक जंक्शन येथे कि.मी. ८४२.५८० वर उड्डाणपूल व त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत महामार्गावरील अस्तित्वात असणारा पुणे (बावधन) – एन.डी.ए., मुळशी ओव्हरपास १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पाडण्याचे नियोजन आहे.
हा पूल तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जबाबदार राहणार नाही , असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.