दसरा मेळाव्यावरुन ‘या’ नेत्याने दिले संकेत ; ‘ज्यांनी हिंदुत्व जपलं तेच मेळावा घेणार’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालीय. निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील (Dasra Melwa) दसरा मेळाव्याचं. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार, यावरून वादाची नवी ठिणगी पेटलीय.

गणेशोत्सवानंतर दसरा मेळाव्यावर निर्णय होईल असे संकेत मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्तांनी दिलेत. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पारंपरिक दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या वतीने आठवडाभरापूर्वी अर्ज सादर करूनही त्याला परवानगी मिळालेली नाही.

त्यामुळे आता शिवसेना पालिका आयुक्त इकबालसिंह चहल (iqbal singh chahal) यांच्याकडे दाद मागणार आहे. सध्या महापालिकेचे कर्मचारी गणेशोत्सवाच्या कामांमध्ये गुंतलेले असल्याने गणेशोत्सव संपल्यावर त्यावर निर्णय होईल, असे महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

ज्यांनी हिंदुत्व जपले त्येचं दसरा मेळावा घेणार म्हणजेच शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार अशी महत्वाची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी दिलीय. तर ठाकरे गट लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी शिंदे गटावर खोटे आरोप करत आहेत, त्यांना माहीत आहे त्यांच्या मागचा जनप्रवाह नाहीसा झालाय असा टोलाही नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *