महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी आणखी एक खुलासा झाला आहे. आरोपींनी सोनालीला गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये मेथॅम्फेटामाइन नावाचे औषध दिले होते. अंजुना पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून ड्रग्ज जप्त केले. या औषधांच्या तपासणीनंतर ते मेथॅम्फेटामाइन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सोनाली फोगटचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान, दुसरा सहकारी सुखविंदर सिंग, रेस्टॉरंट मालक एडविन न्युन्स आणि कथित ड्रग तस्कर दत्ता प्रसाद गावकर यांना अटक केली आहे. सुखविंदर आणि सुधीर सांगवान यांच्यावर खुनाच्या कलमांतर्गत तर गावकर आणि नूनेस यांच्यावर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दत्ता प्रसाद गावकर याने सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांना अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गावकर हा अंजुना येथील ज्या हॉटेलमध्ये फोगट राहत होता, तेथे कर्मचारी आहे. दोन्ही आरोपींनी त्यांच्या जबानीत संशयिताकडून अमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली होती, त्यानंतर संशयित अमली पदार्थ तस्कर दत्तप्रसाद गावकर याला अंजुना येथून ताब्यात घेण्यात आले.
मेथॅम्फेटामाइन म्हणजे काय?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अॅब्युज (NIDA) नुसार, मेथॅम्फेटामाइन हे अत्यंत घातक आणि शक्तिशाली औषध आहे. जर कोणी ते घेतले, तर फार लवकर व्यसन लागतं. याचे कारण असे की मेथॅम्फेटामाइन हे औषध व्यसनी व्यक्तीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते.
मेथॅम्फेटामाइनचे परिणाम?
मेथॅम्फेटामाइन मूड वाढवू शकते, थकवा असलेल्या व्यक्तींमध्ये सतर्कता, एकाग्रता आणि ऊर्जा वाढवू शकते.
भूक कमी होते आणि त्यामुळे वजन कमी होते.
शरीरातील उत्तेजक मनोविकृती (उदा., व्यामोह , मतिभ्रम , प्रलाप आणि भ्रम) आणि हिंसक वर्तन तीव्र करते.
लैंगिक इच्छा वाढते. यासाठी असेही म्हटले जाते की, जर कोणी अनेक दिवस सतत घेतले, तर वृद्धापकाळातही सेक्सची उत्कंठा वाढते.