महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । राज्यातील रेल्वे, मेट्रो, मल्टिमॉडेल कॉरिडॉर तसेच तुळजापूर आणि पंढरपूर देवस्थान या प्रकल्पांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (२९ ऑगस्ट) आढावा घेतला. दोन्ही देवस्थानांचा रेंगाळलेला विकास आराखडा दोन महिन्यांत नव्याने सादर करा आणि आणि मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनास गती द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
याशिवाय राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरीत्या पूर्ण करा, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. याशिवाय तुळजापूरसाठी ३१५ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला २००८ मध्ये मान्यता देण्यात आली.त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासांना चालना मिळणार आहे.
नाशिक-पुणे मार्गाला नीती आयोगाने एप्रिल २०२२ मध्ये मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. यासाठीदेखील खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय व वनजमिनीचे हस्तांरण या बाबींना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.