महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । एकनाथ खडसे म्हणाले की, पूर्वीच्या कालखंडातील भाजपा आणि आत्ताच्या भाजपात जमीन आस्मानचा फरक आहे. पहाटेच्या वेळीस अजित पवारांना घेऊन देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर एकनाथ शिंदे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील ते देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार बनवतील असं वाटलं नव्हतं. राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपा-मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं खडसेंनी सांगितले आहे.
कौटुंबिक संबंधातून राज ठाकरेंची मी भेट घेतली. राजकीय अर्थ काढू नका. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो केंद्रातील नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे घेतील. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपा कशी वाढेल हीच माझी जबाबदारी, युतीबाबत जी भूमिका असेल ते वरिष्ठ नेते घेतील असं सांगत भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सूतोवाच केले