भाजपचे नेते आशिष शेलार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी ; राजकीय चर्चांना उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सत्तासंघर्षामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. अशा राजकीय तापलेल्या वातावरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खास असलेले मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांच्या घरी पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहायक मिलींद नार्वेकर यांच्या वांद्रे येथील घरी मुंबई भाजपा अथ्यक्ष आशिष शेलार यांनी भेट दिली. नार्वेकर यांच्या घरी गणरायाची आगमन झाले आहे. त्यामुळे, गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचं, शेलार यांनी सांगितलं. शिवसेना भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच शेलार यांनी नार्वेकर यांच्या घरी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, मिलींद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय माणले जातात. ज्यावेळी शिंदे गटाने सुरत गाठले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना परत बोलावण्याची जबाबदारी नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी नार्वेकर हे सुरतला सुद्धा गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *