दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंना देणार आणखी माेठा धक्का; आखला मास्टर प्लॅन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ सप्टेंबर । दसरा मेळाव्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पुन्हा आमनेसामने आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. यासाठीस शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमिवर आता मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे.(Shivsena Dasara Melava 2022)

मुंबईतील १० ते १५ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दसरा मेळाव्यात हे नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या जवळचा एक नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबईतील ४० नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यातील १० ते १५ नगरसेवक दसरा मेळाव्याच्या मुहुर्तावर प्रवेश करणार आहेत.

यावरुन आता पुन्हा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. दूसरीकडे या मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर विभाग प्रमुखांची बैठक घेतली. दसरा मेळाव्यत उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनाही प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *