![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच रेल्वेची वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. तसेच पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, लातूर, परभणी आणि नांदडेमध्येही पावसानं हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मुंबई ठाणे परीसरातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते. ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.