महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । वॉशिंग्टन। : अमेरिकेत कोरोनाचा कहर माजला आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर येतोय. कोरोनामुळे अमेरिकेत मृतांची संख्या 56,500वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 2207 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून मृत्यांचा आकडा काहीसा कमी होत असताना पुन्हा एकदा या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 10 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत 10 लाख 12 हजार 399 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
अमेरिकेत आतापर्यंत 58 लाखहून अधिक लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.