महाराष्ट्र २४- ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलडाणा जिल्हा मधील जवाहर नवोदय विद्यालय शेगाव जि बुलडाणा येथे शिक्षण घेणारे इयत्ता 9 वी चे 21 विद्यार्थी केन्द्र शासणाच्या मायग्रेशन योजना मार्फत 2019-20 या सत्रात नवोदय विद्यालय सरोला जि ,चंबा (हिमाचल प्रदेश) येथे गेलेले आहेत.सदर विद्यार्थी याचे शैक्षणिक सत्र दि,25 मार्च 2020 रोजी संपलेले आहे.परंतु कोरोना अनुषंगाने संपुर्ण लॉकडाउन असल्याने विद्यार्थी तेथेच अडकुन आहेत.सदर विद्यार्थी हे 14 ते 15 वर्षे या गटातीळ असल्याने त्यांना घरी जाण्याची ओढ लागलेली आहे.त्यांच्या पालकांना सुध्दा काळजी लागलेली आहे.या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शासन स्तरावरून योग्य निर्देश द्यावे यासाठी मा.डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे पत्रा द्वारे मागणी केली.