CM Eknath Shinde : आता एकनाथ शिंदें ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा करणार ; राज्यात पुढचे काही दिवस राजकीय घडामोडींचे..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) लवकरच ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा करणार आहेत. 20 ते 30 सप्टेंबर या काळात ते ही यात्रा करतील. या बहुचर्चित यात्रेसाठी त्यांना भगवी शाल आणि रुद्राक्षांची माळ देण्यात आली आहे. त्यामुळं आता या यात्रेदरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसणार का? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला शिंदे गटाकडून या यात्रेच्या रुपात प्रत्युत्तर देण्यात येत आहे. (CM Eknath Shinde is all set for hindu garva garjana yatra)

यात्रेपूर्वी पार पडलेल्या (Shinde clane) शिंदे गटाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हिंदुत्वाचा नारा देण्यात आला. या बैठकीवेळी स्टेजवर लावलेल्या पोस्टरवर ‘गर्वसे कहो,हम हिंदू है’चा नाराही लिहिण्यात आला होता.

एकनाथ शिंदे यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असणारी वातावरणनिर्मिती पाहता, पुन्हा एकदा अनेकांनाच बाळासाहेब आठवले आहेत. मुख्य म्हणजे शिवसेनेतील या दुफळीमुळं बाळासाहेबांची तत्त्व कुठेतरी मागे पडत त्यावर राजकीय डावपेचांची धुळ जमत असल्याची नाराजीही काहींनी व्यक्त केली आहे.

राज्यातील सध्याचं एकंदर वातावरण पाहता पुढचे काही दिवस बडे नेते विविध यात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद आणि संपर्क साधताना दिसणार आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये शासनाने घेतलेले निर्णय़ जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी संबंधित पदाधिकारी, मंत्री, नागरिकांची प्रभागानुसार भेट घेत त्यांच्याशी संवाद साधतील अशी या यात्रेची आखणी असणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *