महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता. न्यालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कड आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.