महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर सध्या चांगली संधी आहे. आजच्या घसरणीनंतर सोन्याने चार महिन्यांचा नीचांक गाठला आहे. पुढील आठवड्यात फेडरल रिझव्र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने सोन्याचे दर आणखी खाली जाण्याची अपेक्षा आहे.
या आठवड्यात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सणासुदीचा हंगामही येऊन ठेपला असून लग्नसराईचाही मोसम पुढे येत असल्याने सराफा बाजारात गर्दी वाढणार आहे. किमती घसरल्याने ग्राहकांची संख्या आणखी वाढू शकते. जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही एक चांगली संधी आहे. आजच्या घसरणीनंतर सोन्याने चार महिन्यांचा नीचांक गाठला आहे. सोने पुन्हा एकदा ५०,००० रुपये प्रति ग्रॅमच्या खाली आले आहे. पुढील आठवड्यात फेडरल रिझव्र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने सोन्याचे भाव आणखी खाली जाण्याची अपेक्षा आहे.
आज मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर ४९,७९० रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर ५६,७६५ रुपये प्रतिकिलो ५६,८८५ रुपये प्रति किलो इतके होते.