पुण्यातल्या त्या जाहिरातीमुळे नवा वाद ; पुण्यात नक्की चाललंय काय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । पुण्यात नवरात्र स्पेशल कॅम्प कोर्सची जाहिरात व्हायरल झाली आहे. हा कोर्स सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनचा असल्याचंही जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे.

सेक्स तंत्र कोर्ससाठी ऑनलाईन बुकिंगची ही जाहिरात असल्याचं समोर आलं आहे. सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनचा सेक्स तंत्राचा हा तीन दिवसांचा कोर्स आहे. हा कोर्स नेमका काय आहे, तिकडे काय केलं जाणार आहे? याबाबत जाहिरातीमध्ये कोणतीही सुस्पष्टता देण्यात आलेली नाही. 15 हजार रुपये देऊन तीन दिवसांचा हा कोर्स असल्याची जाहिरात करण्यात आली आहे. तरुण-तरुणींना हे 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव स्पेशल पॅकेज असल्याचं सांगितलं गेलं आहे.

या कोर्समध्ये वैदिक सेक्स तंत्र, स्नायूंना ताकदवान बनवणं, मेडिटेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सत्यम शिवम सुंदरम हे फाऊंडेशन नेमकं कुणाचं आहे? हा कोर्स कुठे घेण्यात येणार आहे, याबाबत या जाहिरातीमध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान हिंदू महासंघाने या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. सेक्स तंत्र या नावाने पुण्यात गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट घालत आहे. नवरात्री स्पेशल असं नाव याला दिलं गेलं आहे. हा हिंदूचा आणि त्यांच्या देवतांचा अपमान आहे, हे हिंदू महासंघ सहन करणार नाही, असं हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत. या जाहिरातीमध्ये आयोजकांचा पत्ता आणि इतर कोणतीही माहिती नाही. यावरून हे सगळं फसवं, घाणेरडं आणि एका नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारं ठरणार आहे. हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया दवे यांनी दिली आहे.

शुक्रवारी दुपारी 12 वाजता आम्ही सीपी ऑफिसवर याबाबतचे निवेदन द्याययला जाणार आहोत, या विकृतीला रोखण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू, असं दवे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *