मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर चालकांना आता इतके रुपये भरावे लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकरात (टोल) येत्या १ एप्रिल २०२३ पासून वाढ होणार आहे. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या कारचालकांना टोलसाठी ५० रुपये अधिक मोजावे लागणार असून, त्यामुळे कारसाठी सध्या आकारल्या जाणाऱ्या टोलची रकक्म २७० रुपयांवरून ३२० रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढीनुसार मिनी बससाठी ४९५ रुपये, ट्रकसाठी ६८५ रुपये, बससाठी ९४० रुपये टोल आकारला जाईल.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २५ वर्षांसाठी, म्हणजेच २०३० पर्यंत टोलवसुलीची परवानगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) राज्य सरकारने दिली आहे. तसेच दर तीन वर्षांनी या टोलमध्ये वाढीची परवानगी एमएसआरडीसीला देण्यात आली आहे. या महामार्गावर २००५ ते २००८ या काळात कारसाठी ११८ रुपये टोल आकारला जात होता. त्यात वाढ होत होत, २०२० ते २०२३ या कालावधीसाठी कार चालकांसाठीच्या टोलची रक्कम २७० रुपयांवर पोहोचली. पुढील वर्षी १ एप्रिलपासून त्यात ५० रुपयांची वाढ केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *