नास्त्रेदामसची भविष्यवाणी खरी ठरणार ? किंग चार्ल्स राजगादी सोडतील आणि त्यांच्यानंतर ज्याला ती मिळेल त्याचे नाव हैरान करणारे असेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ता नास्त्रेदामस यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी ब्रिटनचे नवे राजा तिसरे चार्ल्स यांच्याबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. किंग चार्ल्स राजगादी सोडतील आणि त्यांच्यानंतर ज्याला ती मिळेल त्याचे नाव हैरान करणारे असेल अशी भविष्यवाणी ४०० वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

नास्त्रेदामसने १५५५ मध्ये हे सांगितले होते. २०२२ मध्ये महाराणी एलिझाबेथ यांचा ९४ व्या वर्षी मृत्यू होईल असे ४०० वर्षांपूर्वी सांगितले होते. ही भविष्यवाणी ८ सप्टेंबरला खरी ठरली. यामुळे आता नव्या राजाबाबतची भविष्यवाणी देखील खरी ठरेल का याबाबत युरोपमध्ये उत्सुकता आहे.

2005 मध्ये, मारियो रीडिंगचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते. चार्ल्सबद्दल या पुस्तकात अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. रीडिंगनुसार, राजा चार्ल्स यांना वयाच्या ७४ व्या वर्षी ब्रिटनची राजगादी मिळाली. यानंतर काही काळातच त्यांना ही राजगादी सोडावी लागेल, असे म्हटले गेले आहे. हे पुस्तक नास्त्रेदामसच्या भविष्यवाण्यांचे आहे.

प्रिन्स चार्ल्स राजा झाल्याने देशातील अनेकजण नाराज झाले आहेत. चार्ल्सचा प्रिन्सेस डायनापासून घटस्फोट, त्याचे वय आणि अशा इतर काही मुद्द्यांमुळे जनता त्याच्या विरोधात असेल. यामुळे चार्ल्सला राजेशाही सोडण्यास भाग पाडले जाईल. यानंतर प्रिन्स विल्यम राजा होणार नाही, तर त्यांचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी सिंहासनावर बसेल. तो 38 व्या वर्षी राजा होईल, असे या भविष्यवाणीत म्हटले आहे.

नॉस्ट्राडेमसची ही कविता आहे. यात ‘बेटांचा राजा’ असा शब्द वापरण्यात आला आहे. चार्ल्स राजगादीवर बसताच अनेक देश ब्रिटनपासून वेगळे होतील, असे या कवितेतून म्हटले गेले आहे. ब्रिटीश राजवटीपासून वेगळे होऊन राजा आपली स्वतंत्र राजवट जाहीर करेल, असेही म्हटले गेले आहे. परंतू त्यानंतर त्याच्याविरोधात आंदोलनांना सुरुवात होईल.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर अंतिम दर्शनाच्या निमित्ताने राजपुत्र विलियम, हॅरी हे दोन भाऊ तसेच या दोघांच्या पत्नी असा सारा परिवार पुन्हा एकत्र दिसला ही अतिशय मोठी घटना मानली जात आहे. राजघराण्यापासून दुरावलेल्या प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती राहण्यासाठी पाचारण करावे, असा दूरध्वनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी आपला पुत्र विलियम यांना केला. त्यानंतर विलियम यांनी अमेरिकेतून प्रिन्स हॅरी व मेगन यांना लंडनला बोलावून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *