Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीचा पुन्हा मोठा झटका, जामीन देण्यास दर्शवला विरोध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ईडीने उत्तर दाखल केले आहे.

मुंबईतील पत्राचाळ प्रकल्प आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने (ED) संजय राऊत यांना अटक केली होती. ३१ जुलै रोजी ईडीने अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

सध्या संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर ईडीने कोर्टात उत्तर दाखल केले असून, संजय राऊत यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, राज्यात घडलेल्या सत्तांतरामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर हे ED सरकार आहे. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताला धरून भाजपने आमदारांवर दबाव टाकून हे सरकार सत्तेत आणलं असल्याचं विरोधक म्हणत आहेत.

तर शिवसेनेची तोफ म्हणून ज्या संजय राऊतांकडे पाहिलं जातं त्यांच्या अडणींमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या अडचणींमुळे भाजपला नेहमी प्रखर विरोध करणं नडलं असल्याचंही लोक खासगीत बोलत आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेनेची कोर्टातली लढाई, पक्षाला पडलेलं भगदाड आणि अशातच संजय राऊतांचा सारखा प्रवक्ता कोठडीत असल्यामुळे ठाकरे गटाचं नक्कीचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *