जडेजाची अनुपस्थिती हा भारताला मोठा धक्का

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ सप्टेंबर । अष्टपैलू रवींद्र जडेजाचे जखमी होऊन संघाबाहेर पडणे हा आगामी टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियाला मोठा धक्का आहे. मात्र, माजी कर्णधार विराट कोहली याला तीन वर्षांनंतर फलंदाजीत सूर गवसणे हे शुभसंकेत मानावे लागतील, असे मत श्रीलंकेचे माजी दिग्गज माहेला जयवर्धने यांनी व्यक्त केले आहे.

जडेजा हा आशिया चषक स्पर्धेत जखमी झाला होता. यामुळे ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या टी-२० विश्वचषकाआधी १५ सदस्यांच्या भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात मत मांडताना जयवर्धने म्हणाले, ‘हे एक आव्हान असेल. जडेजा पाचव्या स्थानावर दमदार खेळाडू आहे. खरे तर फलंदाजीतही तो उपयुक्त होता. तो आणि हार्दिक हे आघाडीच्या सहा फलंदाजांमध्ये अष्टपैलू म्हणून चांगला पर्याय उपलब्ध करून देत होते. यामुळे भारताचा फलंदाजी क्रमदेखील भक्कम झाला होता. विश्वचषकात भारताला अडचण जाणवेल. कारण संघात डावखुरा एकही फलंदाज नसणे हा चिंतेचा विषय ठरावा. आशिया चषकात व्यवस्थापनाने चौथ्या-पाचव्या स्थानावर डावे- उजवे संयोजन तयार करण्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेर बसवून ऋषभ पंतला खेळविले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *